#कोविड-१९ संक्रमित #मृतदेहापासून धोका आहे का? #Corona #Deadbody
योग्य काळजी घेतली तर कोविड-१९ संक्रमित मृतदेहापासून संसर्ग पसरण्याची शक्यता नाही.

कोविड-१९ संक्रमित असलेल्या मृतदेहाची प्रतिष्ठा व मान सन्मान जपायला हवा.
मृतदेहांपासून आरोग्याला मोठा धोका असतो असा जो सर्वसामान्य व व्यापक समज आहे तो चुकीचा आहे व असा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकते कि साथीच्या आजाराने ग्रासित असलेला मृतदेह हा दुसऱ्यांना त्या रोगांची लागण करू शकतो. तसेच बहुतेक विषाणू मृत्यूनंतर मानवी शरीरात जास्त काळ टिकत नाहीत असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लू. एच. ओ.) जाहीर केले आहे.
एक सामान्य समज आहे की ज्या लोकांचा संसर्गजन्य रोगाने मृत्यू झाला आहे त्यांचे दाहसंस्कार (Cremation) केले जावेत, परंतु हे सत्य नाही. दहन (Cremation) करावे की दफन करावे ही सांस्कृतिक निवड आहे.
मृतांच्या सन्मान, त्यांची सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान केला पाहिजे आणि संपूर्णपणे त्यांचे संरक्षण केले पाहिजे असे हि मत डब्लू. एच. ओ ने २४.०३.२० रोजी जारी केलेल्या निर्देशात मांडले आहे.
भारत #सरकारच्या आरोग्य विभागाने सुद्धा डब्लू. एच. ओ चा आधार घेऊन नातेवाईकांसाठी खालील सूचना केल्या आहेत.
• नातेवाईकांकडे मृतदेह ताब्यात देताना, फक्त जवळच्या नातेवाईकाला (योग्य त्या पीपीई सह) मृत शरीर आरोग्य कर्मचार्यां द्वारे एका मीटरच्या अंतरावरून दाखविले जाईल.
• आपल्या प्रिय व्यक्तीचे मृत शरीर सर्व मानक सावधगिरी बाळगून रूग्णालया द्वारे पॅक केले जाईल. बॉडी बॅग / पॅकिंगच्या बाहेरील भागांना देखील प्रतिबंधित केले जाईल. म्हणून, मृत शरीरा कडून संसर्ग होण्याचा कोणताही अतिरिक्त धोका उद्भवत नाही.
• रुग्णालयाद्वारे पॅक केलेला मृतदेह घरात किंवा वाहतुकीच्या वेळी उघडू नये.
• जर आपल्याला शेवटच्या वेळेस रुग्णालयात मृतदेह बघायचा असेल तर रुग्णालयाचे आरोग्य सेवा कर्मचारी (सर्व मानक सावधगिरी बाळगून) बॉडी बॅग उघडून मृतदेहाचा फक्त चेहरा पाहण्याची परवानगी देऊ शकतात.
• मृतदेहाची हाताळणी करणारे नातेवाईक सर्जिकल मास्क व हातमोजे घालून सावधगिरीची मानक तत्वे पाळू शकतात.
• धार्मिक लिपी वाचणे, पवित्र पाणी शिंपडणे आणि शरीराला स्पर्श न होता करता येणाऱ्या अश्या कोणत्याही धार्मिक विधी आपण करू शकता.
• कृपया मृतदेहाची आंघोळ करणे, चुंबन घेणे, आलिंगन आणि इतर क्रिया ज्यामुळे मृतदेहाला स्पर्श होऊ शकतो अश्या सर्व क्रिया टाळाव्यात.
• असा सल्ला दिला जातो की मर्यादित लोकांनीच मृतदेहाला स्पर्श करावा व ते हि हाताळताना काळजी घेऊन.
• दाहसंस्कारानंतर किंवा दफनानंतर कुटुंबातील सदस्यांनी हातांची स्वच्छता करावी.
• शेवटचा संस्कार करण्यासाठी आपण राख गोळा करू शकता. यामुळे कोणताही धोका नाही.
• स्मशानभूमी / दफनभूमीवर सामाजिक किंवा शारिरीक अंतरावर उपाय म्हणून मोठ्या संख्येने जमा होऊ नका कारण आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तीमुळे विषाणू चा संसर्ग दुसऱ्या व्यक्तींना होऊ शकतो.

जर आरोग्य कर्मचार्यांनी किंवा कुटुंबातील सदस्यांनी सरकारने दिलेल्या निर्देशांचे सावधगिरीने पालन केले तर कोविड- 19 पॉझिटिव्ह असलेल्या मृत शरीरापासून संसर्ग होण्याचा कोणताही धोका त्यांना नसतो. व यामुळे मृतदेहाची विटंबना पण होणार नाही.
संकलन:
डॉ. इंद्रजीत खांडेकर. प्राध्यापक. न्याय वैद्यक शास्त्र विभाग. सेवाग्राम.
#Covid19, #coronapandemic #coronafighters #epidemic,

#References:
1) World Health Organization. WHO. Are there disease risks from dead bodies and what should be done for safe disposal? https://www.who.int/water_sanitation_…/…/emergencies_qa8/en/
2) World Health Organization. WHO. Risks posed by dead bodies after disasters. https://www.who.int/diseasecontrol_emergencies/guidelines/…/
3) WHO. Interim guidance dated 42.03.20. Infection Prevention and Control for the safe management of a dead body in the context of COVID-19 https://apps.who.int/…/WHO-COVID-19-lPC_DBMgmt-2020.1-eng.p…
4) WHO. Interim guidance dated 42.03.20. Infection Prevention and Control for the safe management of a dead body in the context of COVID-19 https://apps.who.int/…/WHO-COVID-19-lPC_DBMgmt-2020.1-eng.p…
5) WHO. Interim guidance dated 24.03.20. Infection Prevention and Control for the safe management of a dead body in the context of COVID-19 https://apps.who.int/…/WHO-COVID-19-lPC_DBMgmt-2020.1-eng.p…
6) COVID-19: GUIDELINES ON DEAD BODY MANAGEMENT. Government of India Ministry of Health & Family Welfare Directorate General of Health Services. Dated 15.03.2020 https://www.mohfw.gov.in/…/1584423700568_COVID19Guidelineso…

No comments:
Post a Comment