Friday, April 24, 2020

#कोविड_19_विषाणूची_लागण_झालेल्या_लोकांची_वास्तविक_संख्या आपल्याला #केव्हा_कळेल? When we will get to know about actual % of population infected with Covid-19?

हे जाणून घेण्यासाठी आपल्याला याआधी येऊन गेलेल्या अश्या साथींचा अभ्यास करावा लागेल.
यासाठी आपण 2009- 2010 मध्ये आलेल्या स्वाईन फ्लूच्या (novel H1N1) साथीचे उदाहरण घेऊ.
जर आपण #सरकारी_नोंदींकडे गेलो तर त्यानुसार 2009 आणि 2010 मध्ये प्रयोगशाळेने पुष्टी केलेली स्वाईन फ्लू विषाणूची लागण झालेली प्रकरणे केवळ 47840 होती. परंतु जेव्हा 2009-2010 मध्ये आलेल्या इन्फ्लूएन्झा- स्वाईन फ्लूच्या साथीच्या नंतर भारत देशासह १९ देशा मध्ये डब्लू. एच. ओ. द्वारा सेरोलॉजीकल-सर्वे- #Population_surveillance (म्हणजे विषाणूच्या अँटीबॉडीज बघण्यासाठी लोकांच्या सीरम-रक्ताची चाचणी) च्या आधारे मेटा-अनालिसिस (विश्लेषण) केले गेले होते त्यानुसार वास्तविक मध्ये स्वाईन फ्लू विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या सरकारने प्रयोगशाळेद्वारे पुष्टी केलेल्या प्रकारनापेक्षा खूप जास्त दिसून आली. #डब्लू_एच_ओ च्या या सर्वे नुसार, साथीच्या पहिल्या वर्षाच्या दरम्यान भारतासह 19 देशांमधील जवळपास 20-27 % लोकसंख्येला स्वाईन फ्लू विषाणूची लागण झाली होती.
म्हणजे या संशोधनानुसार भारतातील सुमारे 25 कोटी 40 लाख ते 34 कोटी 29 लाख लोकांना (त्या वेळी भारतीय लोकसंख्या सुमारे 127 कोटीनुसार) साथीच्या पहिल्या वर्षी स्वाईन फ्लू विषाणूची लागण झाली होती.
#मग_प्रश्न_हा_निर्माण_होतो की साथीदरम्यान प्रयोगशाळेमध्ये पुष्टी केलेल्या #विषाणूची_लागण_झालेल्या प्रकरणांचा #सरकारी_आकडा इतका #कमी_का_दिसतो ?
#तज्ञांच्या मते वास्तविक मध्ये विषाणूची लागण झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा साथीदरम्यान प्रयोगशाळेमध्ये पुष्टी केलेल्या प्रकरणांच्या कमी संख्या असण्याला वैद्यकीय कारण आहे. उर्वरित आधीच संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे नसल्यामुळे किंवा कदाचित किरकोळ लक्षणे असल्यामुळे व त्यांना रुग्णालयात येण्याची किंवा भरती होण्याची गरज न पडल्यामुळे त्यांची साथीच्या दरम्यान तपासणी करण्यात आली नसते. म्हणजेच खूप जास्त लोक संक्रमित होऊन नकळत बरे पण झाले असतात पण त्यांची साथीच्या वेळी तपासणी झाली नसल्यामुळे त्यांना माहित सुद्धा नसते कि आपल्याला साथीच्या काळात सदर विषाणूची ची लागण झाली होती.
तज्ञ म्हणतात की यावरून हे लक्षात येते की इतक्या जास्त लोकांना लागण होऊन ही यात जास्त घाबरण्यासारखे_नसते, कारण जास्त लोकांना हा विषाणू लक्षणे उत्पन्न करीत नाही किंवा किरकोळ लक्षणे निर्माण करतो. व #कोरोना मध्ये पण लागण झाली असेल तरीही 80% लोकांना लक्षणे उत्पन्न होत नाही व खूप कमी लोकांना गंभीर लक्षणे निर्माण होतात.

घाबरण्याचे कारण जास्त तेव्हा असते जेव्हा विषाणूची लागण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला गंभीर लक्षणे निर्माण होतात.
तसेही तज्ञांच्या मते #साथ_सुरु_असतांना बहुतांश #प्रकरणांची_प्रयोगशाळेमध्ये_पुष्टी करणे #अव्यवहार्य_असते कारण साथीच्या वेळेस सर्व यंत्रणेचे लक्ष हे गंभीर असलेल्या रुग्णांना योग्य ते उपचार देणे व मृत्यू कमी करणे ह्या महत्वाच्या कार्याकडे असते.
तज्ञांच्या मते स्वाईन फ्लू प्रमाणेच जेव्हा कोरोना साठी सेरोलॉजीकल-सर्वे (Population surveillance) वर आधारीत मेटा-विश्लेषण केले जाईल तेव्हा या कोरोना साथीच्या सर्वप्रथम लहरी मध्ये अंदाजे किती लोकांना वास्तविक मध्ये कोरोनाची लागण झाली होती याची टक्केवारी मिळेल. तोपर्यंत आम्हाला केवळ प्रयोगशाळेमध्ये पुष्टी केलेल्या घटनांची संख्या मिळेल आणि वास्तविक लागण झालेल्या लोकसंख्येच्या टक्केवारी मिळणार नाही.
तज्ञांच्या मतानुसार, कोरोना ची वास्तविक मध्ये किती लोकांना लागण झाली आहे हे बघण्यासाठी संबधित यंत्रणा, डब्लू.एच.ओ व तज्ञ मंडळी साथ निघून गेल्यानंतर सेरोलॉजीकल-सर्वे (Population surveillance) व इतर सर्वे करतील व त्यावरून पुढे जर अशी साथ आली तर काय काय उपाययोजना करणे योग्य राहील याचा उहापोह संबधित यंत्रणा व तज्ञ करतील.
#संकलन: डॉ इंद्रजीत खांडेकर
प्राध्यापक, न्यायवैद्यक तज्ञ.
2) National Centre for Disease Control, Ministry of Health & Family Welfare. Govt of India. https://ncdc.gov.in/index4.php…
3) Van Kerkhove MD, Hirve S, Koukounari A, Mounts AW H1N1pdm Serology Working Group. Estimating age-specific cumulative incidence for the 2009 influenza pandemic: a meta-analysis of A(H1N1)pdm09 serological studies from 19 countries. Influenza Other Respir Viruses. 2013 Sep; 7(5):872-86.
4) Charles Patrick Davis, MD, PhD. Swine Flu (Novel H1N1 Influenza and H3N2v). emedicinehealth. https://www.emedicinehealth.com/swine_flu/article_em.htm…
5) Seroprevalence to Influenza A(H1N1) 2009 Virus—Where Are We? Eeva Broberg, Angus Nicoll, Andrew Amato-Gauci Clin Vaccine Immunol. 2011 Aug; 18(8): 1205–1212. doi: 10.1128/CVI.05072-11 PMCID: PMC3147351. Available on https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3147351/
6) Also see. Study puts global 2009 pandemic H1N1 infection rate at 24%. Centre for Infectious Disease Research and Policy. University of Minnesota. https://www.cidrap.umn.edu/…/study-puts-global-2009-pandemi…
7) Murhekar Manoj, Mehendale Sanjay. The 2015 influenza A (H1N1) pdm09 outbreak in India. Indian J Med Res. 2016 Jun; 143(6): 821–823 https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5094123/
8) WHO Coronavirus disease 2019 (COVID-19) Situation Report – 46 (06.03.2020) https://www.who.int/docs/default-source/coronaviruse/situation-reports/20200306-sitrep-46-covid-19.pdf?sfvrsn=96b04adf_2
9) Covid-19: four fifths of cases are asymptomatic, China figures indicate. BMJ 2020;369:m1375 doi: https://doi.org/10.1136/bmj.m1375 (Published 02 April 2020) https://www.bmj.com/content/369/bmj.m1375?=&utm_source=adestra&utm_medium=email&utm_campaign=usage&utm_content=daily&utm_term=text


No comments:

Post a Comment