Saturday, April 25, 2020

कोविड-19 विषाणू आपल्या सोबत बराच काळ/ सैदैव राहील का? Will #Covid-19 will remain with us longer/ forever? Learn to Live with covid ! आपल्याला कोविड-19 सोबत जगणे शिकावे लागेल का?

याआधी येऊन गेलेल्या ४ पेक्षा जास्त कोरोना विषाणू, स्वाईन फ्लू तसेच इतर मानवी श्वसनजन्य विषाणू सोबत आपण जगणे शिकलो आहोतच ना ! मग या सोबत जगणे पण शिकावे लागेल का?
हार्वर्ड एपिडेमिओलॉजीचे प्राध्यापक मार्क लिपिसिच म्हणाले की येत्या वर्षभरात जगभरातील जवळपास 40 ते 70 टक्के लोकांना कोव्हीड-19 विषाणूची लागण होईल. परंतु त्यांनी जोरदारपणे स्पष्टीकरण दिलेयाचा अर्थ असा नाही की सर्वांना गंभीर आजार होतील. ते म्हणाले, “बहुधा अनेकांना सौम्य आजार असेल किंवा कुठलीही लक्षणे नसतील.” ते पुढे म्हणाले की पण हा विषाणू सर्वत्र पसरतच जाईल (Ref-1).

डब्ल्यू. एच. ओ. (Ref-2) नुसार तसेच ब्रिटीश मेडिकल जर्नल (Ref-3) मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार कोव्हीड-19 विषाणूची लागण झालेल्या 80% लोकांना कुठलीही लक्षणे नाहीत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी सुद्धा यावर असेच भाष्य केले आहे (Ref-4).
म्हणजेच ज्याप्रकारे आधी येऊन गेलेल्या साथी मध्ये बऱ्याच लोकांना कळले नाही की साथीच्या विषाणूची आपल्याला नकळत लागण होऊन गेली होती (लक्षणे न दिसल्यामुळे किंवा सौम्य लक्षणे उद्भवल्या मुळे) त्याचप्रकारे कोविड ची आपल्याला लागण होऊन गेली आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळणार नाही. आणि ज्या प्रकारे आधीचे असे विषाणू सर्वत्र पसरलेले आहे त्याच प्रकारे कोविड ही पसरेल.

कोविड मुळे इतक्या लोकांना लक्षणे निर्माण न होणे यावरून हे समजते की ह्या विषाणूची घातकता खूप कमी आहे.
म्हणजेच ज्याप्रकारे आधी येऊन गेलेल्या साथी मध्ये बऱ्याच लोकांना कळले नाही की साथीच्या विषाणूची आपल्याला नकळत लागण होऊन गेली होती (लक्षणे न दिसल्यामुळे किंवा सौम्य लक्षणे उद्भवल्या मुळे) त्याचप्रकारे कोविड ची आपल्याला लागण होऊन गेली आहे हे सुद्धा बऱ्याच लोकांना कळणार नाही. आणि ज्या प्रकारे आधीचे असे विषाणू सर्वत्र पसरलेले आहे त्याच प्रकारे कोविड ही पसरेल.
कोविड मुळे इतक्या लोकांना लक्षणे निर्माण न होणे यावरून हे समजते की ह्या विषाणूची घातकता खूप कमी आहे.
लांसेट (Lancet Medical Journal) मध्ये 29.02.2020 ला प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार (Ref-5) लक्षणे नसलेल्या कोविड 19 रुग्णांचा आधीच खूप फैलाव (निर्यात) झाला असल्यामुळे जागतिक स्तरावर मोठ्या शहरांमध्ये कोविड 19 चा स्वतंत्र स्वावलंबी उद्रेक अपरिहार्य होऊ शकतो.
Tom Jefferson (An epidemiologist and honorary research fellow at the Centre for Evidence-Based Medicine at the University of Oxford) हे ब्रिटीश मेडिकल जर्नल मध्ये म्हणाले कि असे लक्षणे नसलेल्या कोविड 19 व्यक्ती 10% जरी बाहेर असतील तर याचा अर्थ असा होतो कि हा विषाणू सर्वत्र आहे. ते परत म्हणाले कि यामुळे आपण जेव्हा पासून समजत होतो त्याच्या खूप आधीपासूनच हा विषाणू लोकांमध्ये फिरत होता आणि त्यामुळे खूप मोठ्या लोकसंख्येला याची आधीच लागण झाली असेल हि शक्यता नाकारता येत नाही. जर इतक्या लोकांना आधीच लागण झाली असेल तर मग लॉकडाऊन वर प्रश्न चिन्ह निर्माण होतात? असे Tom Jefferson म्हणाले (Ref-6).
लक्षणे नसलेल्या कोविड 19 रुग्णांना/लोकांना एवढ्या जास्त लोकासंख्येमधून ओळखणेव त्यांना विलगीकरण  करणे हे आपल्या सारख्या लोकसंख्या खूप असलेल्या देशातील यंत्रणेला खूप कठीणच नाही तर अशक्य आहे. व अशी लक्षणे नसलेल्या कोविड 19 व्यक्ती पहिली केस नोंद होण्याच्या आधीच सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यामुळे तज्ञ असे म्हणतात कि जे विषाणू जास्त लोकांमध्ये लक्षणे निर्माण करत नाहीत किंवा कमी लक्षणे निर्माण करतात त्या विषाणूचा फैलाव होतच राहतो.   
तज्ञांच्या मते बहुदा कोविड-19 हा याआधी अस्तित्वात असलेल्या मानवी श्वसनजन्य विषाणूच्या संचाचा एक कायमचा भाग होईल. (Ref-7 & 8).
आधीपासून अस्तित्वात असलेल्या चार कोरोना विषाणूसाठी अजूनही लोकांना दीर्घकाळ टिकणारी प्रतिकारशक्ती विकसित झाली नाही. जर कोविड-19 ने या आधी आलेल्या कोरोना विषाणूचे  अनुसरण केले व आता जसा फैलाव होत आहे तसाच फैलाव झाला तर आपला “कोल्ड आणि फ्लू सीझन” “कोल्ड आणि फ्लू आणि कोविड 19 सीझन” होऊ शकतो असे तज्ञांना वाटते (Ref-9).
यावरून हा अंदाज बांधता येऊ शकतो कि कोरोना व्हायरस येथे राहण्यासाठी आला आहे. म्हणून आपण याआधी येऊन गेलेल्या ४ पेक्षा जास्त कोरोना विषाणू तसेच स्वाईन फ्लू व इतर मानवी श्वसनजन्य विषाणू सोबत जसे जगायला शिकलो तसेच यासोबतही आता जगणे शिकावे लागेल असे तज्ञांना वाटते.
आधीच्या आलेल्या साथींचा जर अभ्यास केला तर तज्ञाच्या मते साथीच्या विषाणूंनी आपल्यासोबत किती काळ राहावे याची वेळ विषाणू स्वतः निश्चित करीत असतोदुर्दैवाने आपण नाही.
संकलन:
डॉ. इंद्रजीत खांडेकर
प्राध्यापक. न्यायवैद्यक शास्त्र विभाग, MGIMS Sewagram.
For further details please click the blog link https://drilkhandekar.blogspot.com/

.
References:
1.       You’re Likely to Get the Coronavirus. Most cases are not life-threatening, which is also what makes the virus a historic challenge to contain. The Atlantic. FEBRUARY 24, 2020 https://www.theatlantic.com/health/archive/2020/02/covid-vaccine/607000/
2.       WHO Coronavirus disease 2019 (COVID-19) Situation Report – 46 (06.03.2020) https://www.who.int/docs/default-source/coronaviruse/situation-reports/20200306-sitrep-46-covid-19.pdf?sfvrsn=96b04adf_2
3.       Covid-19: four fifths of cases are asymptomatic, China figures indicate. BMJ 2020;369:m1375 doi: https://doi.org/10.1136/bmj.m1375 (Published 02 April 2020)
5.       Joseph T Wu, Kathy Leung, Gabriel M Leung. Nowcasting and forecasting the potential domestic and international spread of the 2019-nCoV outbreak originating in Wuhan, China: a modelling study. Lancet 2020; 395: 689–97. https://www.thelancet.com/journals/lancet/article/PIIS0140-6736(20)30260-9/fulltext
6.       Covid-19: four fifths of cases are asymptomatic, China figures indicate. BMJ 2020;369:m1375 doi: https://doi.org/10.1136/bmj.m1375 (Published 02 April 2020)
7.       New Coronavirus May Circulate Forever as a Seasonal, Endemic Pathogen, Experts Fear https://www.sciencealert.com/the-new-coronavirus-could-circulate-forever-says-experts
8.       Could We Be Living With COVID-19 Forever? https://www.discovermagazine.com/health/could-we-be-living-with-covid-19-forever
9.       You’re Likely to Get the Coronavirus. Most cases are not life-threatening, which is also what makes the virus a historic challenge to contain. The Atlantic. FEBRUARY 24, 2020 https://www.theatlantic.com/health/archive/2020/02/covid-vaccine/607000/

#Covidpandemic #coronapandemic #coronafighters #covidlife 


No comments:

Post a Comment